सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या ऐतिहासिक वैभवात मोठी भर; सईबाई राणीसाहेबांसह शिवराय, अहिल्यादेवी होळकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारणार

On: May 8, 2026 9:36 AM
Follow Us:

फलटण – फलटण शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारा महत्त्वपूर्ण निर्णय फलटण नगर परिषदेच्या विशेष आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे भव्य पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार असून, नगरपरिषदेच्या आवारात महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यासोबतच शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा प्रेरणादायी पुतळा तसेच साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या सर्व पुतळ्यांच्या उभारणीमुळे फलटण शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक ओळखीत अधिक भर पडणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण आर्किटेक्ट श्री. रोहन बळीप यांनी केले. पुतळ्यांची रचना, परिसर विकास, आकर्षक सौंदर्यीकरण तसेच नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणारे ऐतिहासिक दर्शन या बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार सचिन पाटील , माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,नगराध्यक्ष श्री. समशेर नाईक निंबाळकर, श्री. शिवरूप राजे खर्डेकर, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस श्री. जयकुमार शिंदे तसेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणाऱ्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, शहराच्या ओळखीत आणखी भर पडणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा  “बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कारवाईचा इशारा; 27 एप्रिलपर्यंत नियमित करा अन्यथा कनेक्शन बंद!” - मुख्याधिकारी निखिल जाधव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!