सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण; ‘फुलेंची शाळा’ लघुपटाचे प्रदर्शन

On: April 13, 2026 9:36 AM
Follow Us:


“डॉ. बी. के. यादव यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा उपक्रम

फलटण : राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सातारा यांच्या वतीने फलटण येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे डॉक्टर मयूर शिंदे – वैद्यकीय, कु. समशेर शिंदे – क्रीडा, विकास शिंदे- पत्रकारिता, सागर चव्हाण – पत्रकारिता, ज.तू. गार्डे – साहित्यिक, शुभांगी बोबडे- शिक्षण, शशिकांत सोनवलकर – शिक्षण, डॉ.वैशाली शिंदे- शिक्षण, किरण दंडिले – उद्योजक, आदित्य शिंदे, तुकाराम कोकाटे- साहित्यिक, अजय शेंडे- कृषी, नाजनीन तांबोळी, डॉ. अमित मोरे – लेखक व दिग्दर्शक आणि फुलेंची शाळा टीम यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हास्तरीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. “सत्यक्रांती दर्शन” या यूट्यूब चॅनेलवर “फुलेंची शाळा” या लघुचित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच बहु आयामी महात्मा ज्योतिबा फुले हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांनी केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर, अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, तसेच जिल्हा परिषद सभापती सौ. लता अविनाश कर्णे उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर पवार सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच रूपाली बोरावके,  मोहिनी भोंगळे, श्री लियाकत शेख, मज्जा संस्था व हृदयविकार तज्ञ डॉक्टर जे टी पोळ, मुनीष जाधव, दत्तोबा शिंदे,सरपंच सागर अभंग, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, अमोल जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “देशातील गुलामगिरी संपवण्याची खरी सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि बहुजनांना शिक्षण देऊन समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवला.”
नगराध्यक्ष श्री समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, “फलटण नगरपालिकेच्या दोन्ही सभागृहांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे देण्याचा ठराव पहिल्याच सभेत घेण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसवून शिक्षण अधिक आधुनिक करण्यात येणार आहे.”
डॉ. बी. के. यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जर महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्याची पारायणे झाली , तर समाजात अंधश्रद्धेला स्थान राहणार नाही त्यामुळे भोंदू बाबा तयार होणार नाहीत ,.”
प्रा. प्रभाकर पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी प्रगतीचा महामार्ग तयार केला आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा ही दुःखाची मूळ कारणे असून, लोकांनी विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारणे आवश्यक आहे.”

हे ही वाचा  सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात जनजागृती उपक्रम

फुलेंची शाळा या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. अमित मोरे म्हणाले, “कोळशातून हिरा कसा तयार होतो, हे मला आधी माहित नव्हते. मात्र डॉ. बी.के. यादव सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”ते पुढे म्हणाले की, डॉ. बी.के. यादव हे सर्वच क्षेत्रांत उच्च स्थानावर आहेत. वैद्यकीय, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्र असो त्यांची विचारसरणी नेहमीच उच्च आणि प्रेरणादायी आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सर्व पदाधिकारी , जयंती महोत्सव समितीचे सदस्य त्यासोबतच लोकमान्य उद्योग समूहाच्या सर्व परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष होते यापुढेही कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जाईल असा विश्वासही डॉक्टर बी.के.यादव यांनी दाखवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!