सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी अजीम आतार पोलिसांच्या ताब्यात

On: May 17, 2026 2:50 PM
Follow Us:

फलटण – दि. १४ मे रोजी फलटण शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून अनिकेत घाडगे या युवकाला असीम आतार याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्याच्या राहत्या घरी जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर फलटणमधील  समाज बांधव आक्रमक झाले होते. संबंधित आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, शुक्रवार पेठ मोहल्ला गल्ली परिसरात लपून बसलेल्या अजीम आतार यास फलटण शहर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईमध्ये फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. काळे, पोलीस कर्मचारी दिनेश शिंदे, टिके, महेश जगदाळे व जयपाल यादव यांनी सहभाग घेत आरोपीला शिताफीने अटक केली.

हे ही वाचा  फलटणमधील फिरंगाई देवी मंदिरासमोर वाढदिवसांच्या धिंगाण्याने नागरिक त्रस्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!