सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन

On: May 5, 2026 10:54 AM
Follow Us:

सातारा : सातारा नगरपरिषदेच्या शहापूर योजना व कास उद्भव योजनेमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे उरमोडी व कास धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा नगरपरिषदेकडून नागरिकांना पाणी वापरात काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी नळ कनेक्शनला तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. तसेच रस्त्यावर पाणी मारणे, पाईपने गाड्या धुणे, कपडे व जनावरे धुणे अशा प्रकारांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नळाला डायरेक्ट मोटार लावण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांची मोटार जप्त केली जाईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.
उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यात पुरेसा राहावा यासाठी सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने व काटकसरीने करावा, असे आवाहन सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.

हे ही वाचा  पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी चौपट नुकसानभरपाईची मागणी – मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

error: Content is protected !!