सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

On: June 24, 2026 9:19 PM
Follow Us:

23 जून ते 10 जुलै 2026 दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार; 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी बांधकामेच विचाराधीन

फलटण : फलटण नगरपरिषदेकडून शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचा नियमानुसार विचार केला जाणार आहे.

या प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 23 जून ते 10 जुलै 2026 रोजी पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर अर्जांची छाननी, पात्र  यादी प्रसिद्ध करणे, हरकती मागविणे, अंतिम यादी जाहीर करणे तसेच जागेची मोजणी आदी टप्प्यांनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

अर्जासोबत 2011 पूर्वीचे वास्तव्य सिद्ध करणारे पुरावे (मतदार यादी प्रत , मालमत्ता कर, पावती विज बिल ), मालमत्ता अथवा 7/12 उतारा, उपग्रह छायाचित्र, आधार छायांकित प्रत, रहिवासी पुरावा, अर्जदाराचा फोटो,शपथपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. रस्ते, नाले, सार्वजनिक वापराच्या जागा, आरक्षित भूखंड किंवा शासन प्रकल्पांसाठी आवश्यक जागांवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी पात्र राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज फलटण नगरपरिषद कार्यालयात सादर करण्याचे आवाहन फलटण नगरपालिका प्रशासनाने केले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

हे ही वाचा  आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन

error: Content is protected !!