सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ढवरा स्पेशल हॉटेलमध्ये भाकरीच्या कारणावरून वाद; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

On: May 11, 2026 8:47 PM
Follow Us:

फलटण  : विडणी (ता. फलटण) येथील जाई हॉटेलमध्ये भाकरी वाढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. १०) रात्री घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील जाई हॉटेलमध्ये भाकरी वाढण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी प्रवीण जाधव (पूर्ण नाव माहित नाही, रा. सोमवार पेठ, फलटण) यांनी खुर्ची उचलून अभिजीत अशोक आढाव (वय ३२, रा. गुणवरे, ता. फलटण) यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तिघांनी हाताने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याबाबत अभिजीत अशोक आढाव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार वावरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!