सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

On: May 13, 2026 6:00 PM
Follow Us:

फलटण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत होती. कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. मात्र बुधवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल होत फलटणसह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली.

फलटण शहर आणि तालुक्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांचा कडकडाट, लखलखाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!