फलटण : वेगाने विस्तारत असलेल्या Lokshahi Bharat News Network मध्ये पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींना पदोन्नतीद्वारे विविध संपादकीय पदांवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
संस्थेच्या पदरचनेनुसार सुरुवातीला प्रतिनिधी म्हणून काम करावे लागणार असून, त्यानंतर अनुभव, जबाबदारी, बातमी संकलन कौशल्य, संस्थेप्रती निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरी यांच्या आधारे पुढील पदांवर पदोन्नती दिली जाणार आहे.
पदोन्नतीची रचना पुढीलप्रमाणे राहणार आहे :
प्रतिनिधी → जिल्हा वृत्त उपसंपादक → जिल्हा वृत्त संपादक → विभागीय संपादक → कार्यकारी संपादक
संस्थेकडून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय, स्थानिक घडामोडी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देणाऱ्या प्रतिनिधींना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
“लोकशाही भारत न्यूज नेटवर्क हे केवळ न्यूज प्लॅटफॉर्म नसून नवोदित पत्रकारांना घडविणारे व्यासपीठ आहे. मेहनत, सातत्य आणि पत्रकारितेची जिद्द असेल तर प्रतिनिधीपासून कार्यकारी संपादक पदापर्यंतचा प्रवास येथे शक्य आहे,” असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
लोकशाही भारत न्यूज नेटवर्कमध्ये पदोन्नतीची सुवर्णसंधी; उत्कृष्ट प्रतिनिधींना संपादकीय पदांवर संधी
By Team LBNN
On: May 11, 2026 8:55 PM






