फलटण – गोखळी येथे शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्वर्गीय राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात यशोदा पब्लिकेशन, पुणे येथील प्रा. राजकुमार महारनवर यांनी हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती बापू गावडे होते. यावेळी प्रा. राजकुमार महारनवर यांचा सत्कार माजी सरपंच रमेश दादा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉक्टर गुणवरे यांचा सत्कार मारुती बापू गावडे यांनी केला. ग्रंथालयाच्या पीओपी कामासाठी मदत केल्याबद्दल खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे यांचा सत्कार कृषी बाजार समिती संचालक ज्ञानदेव बापू गावडे यांनी केला.
तात्याबा अण्णा शिंदे पाटील यांनी १०० पुस्तके दिल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य संतोष दादा गावडे यांनी केला. अक्षय गावडे यांनी स्पर्धा परीक्षांची पुस्तके दिल्याबद्दल त्यांचा सत्कार होनराव सर यांनी केला, तर शुभम जगताप यांनी १० ग्रंथ व पुस्तके दिल्याबद्दल त्यांचा सत्कार विलास भाऊ गावडे यांनी केला.
यावेळी हायस्कूलमधील सस्ते सरांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांचा सत्कार बजरंग नाना गावडे सवई यांनी केला. तसेच फडतरे सरांचा सत्कार बाळू भाऊ गावडे व नंदू मामा गावडे यांनी केला. प्राथमिक शाळेतील होनराव सरांचा सत्कार अभिजीत भैय्या जगताप यांनी केला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन बजरंग नाना गावडे सवई व मारुती बापू गावडे यांनीही केले. कार्यक्रमास एकनाथ गावडे आप्पा, अनिल तात्या धुमाळ, मयूर गावडे (फौजी), सुकुमार भाऊ गावडे, गणेश गावडे सर, गोटू गाढवे, विजय धर्माधिकारी, हायस्कूलचे प्राचार्य सस्ते सर, प्राथमिक शाळेच्या प्राचार्या भोसले मॅडम तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका, गोखळी येथील सर्व सभासदांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गावडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल हरिहर यांनी मानले.
शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचा उपक्रम; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
By Team LBNN
On: May 3, 2026 6:35 PM











