सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मिस फलटण २०२६ चा किताब काजल मठपती तर मिसेस फलटण २०२६ चा किताब स्नेहा शिंदे

On: March 17, 2026 8:51 AM
Follow Us:

फलटण : स्वयंसिद्धा महिला कल्चरल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मिस अँड मिसेस फलटण २०२६” या सौंदर्य व गुणदर्शन स्पर्धेत मिस फलटण २०२६ चा किताब काजल मठपती यांनी पटकावला, तर मिसेस फलटण २०२६ चा किताब सौ. स्नेहा शिंदे यांनी मिळवला.
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फलटण येथे स्वयंसिद्धा महिला कल्चरल ग्रुपतर्फे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर तसेच सिने अभिनेत्री भूमिजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. मधुबाला भोसले होत्या. तसेच स्वयंसिद्धा संस्थेच्या सर्व संचालिका, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते. स्थानिक महिलांना आपली कला, व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास दाखवण्याचे व्यासपीठ या स्पर्धेमुळे मिळाले.
स्पर्धेतील विविध किताबांमध्ये मिस टॅलेंट हा किताब काजल मठपती यांनी, मिस पर्सनॅलिटी हा किताब समरीता अहिवळे यांनी तर मिस क्लोजडोअर इंटरव्ह्यू हा किताब दिशा झेंडे यांनी मिळवला.
तसेच मिसेस फलटण स्पर्धेमध्ये मिसेस टॅलेंट हा किताब सौ. नीता चांगण यांनी, मिसेस पर्सनॅलिटी हा किताब सौ. शीतल करचे यांनी तर मिसेस इंडोअर इंटरव्ह्यू हा किताब श्रीमती रूपा झेंडे यांनी मिळवला.
या स्पर्धेचे परीक्षण सिने अभिनेत्री भूमिजा पाटील तसेच मिस युनिटी वर्ल्ड अर्थ विजेत्या काजल भोईटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. मधुबाला भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी स्किन अस्थेटिकच्या मेकअप आर्टिस्ट अश्विनी गोडसे-भामरे, मेकअप व हेअर आर्टिस्ट श्वेता कदम तसेच नगरसेविका शलाका कणसे, सुपर्णा अहिवळे, रुपाली सस्ते, मृणाल प्रभुणे, स्वप्नाली पटवर्धन, काजल चव्हाण, प्राजक्ता सोनवणे आदींचे सहकार्य लाभले.

हे ही वाचा  सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!