फलटण – उद्या शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जाधववाडी (फ) येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता “महाराजस्व अभियान” मोठ्या आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मा. आमदार श्री सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारसा नोंद, जमीन नोंदणी, तसेच इतर महसूल विषयक कामे एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी हे अभियान विशेष उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती व मार्गदर्शनही याठिकाणी दिले जाणार आहे. गावातील व परिसरातील नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे .












