सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या कु. शिवांजली रणधीर भोसलेची राज्यात ३८ व्या रँकसह घवघवीत झेप; एमपीएससीतून ड्रग्स इन्स्पेक्टरपदी निवड

On: July 23, 2026 3:06 PM
Follow Us:

फलटण – फलटण तालुक्यातील तावडी येथील कु. शिवांजली रणधीर भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन करत ड्रग्स इन्स्पेक्टर पदावर निवड मिळवली आहे. तिने खुल्या गटातून राज्यात 38 वा क्रमांक, तर अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शिवांजलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तावडी येथे झाले. त्यानंतर तिने वेणूताई चव्हाण हायस्कूल, फलटण येथून दहावी, मालोजीराजे कृषी महाविद्यालय, फलटण येथून अकरावी-बारावी शिक्षण पूर्ण केले. पुढे शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, कराड येथून पदवी संपादन केली.

सामान्य कुटुंबातील शिवांजलीने जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. तिचे वडील रणधीर भोसले हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, मुलीच्या या यशामुळे संपूर्ण भोसले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात शिवांजलीने राज्यभरातून 38 वा क्रमांक आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून दुसरा क्रमांक मिळवून फलटण तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!