फलटण : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यास राज्य सरकारांना परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयाची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाज व इतर समाजघटकांची तालुकास्तरीय बैठक उद्या, शनिवार दि. 30 मे 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता वाजता तहसील कार्यालयाच्या समोरील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत पुढील भूमिका, जनजागृती आणि संघटनात्मक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे. सकल मातंग समाज, फलटण तालुका यांच्या वतीने मातंग समाज बांधवांसह संबंधित समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात उद्या फलटण तालुकास्तरीय बैठक
By Team LBNN
On: May 29, 2026 11:26 AM





