सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ढवळ पाटी परिसरात युवकाचा खून; प्रेमप्रकरणातून वादाचा संशय

On: April 10, 2026 1:44 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण तालुक्यातील ढवळ पाटी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १५ जणांच्या जमावाने एकत्र येत या युवकावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत युवक हा मिराचीवाडी  येथील रहिवासी असल्याचे समजते.
घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे ही वाचा  स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वावर शोककळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!