सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन

On: November 7, 2025 7:34 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण प्रतिनिधी: ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज सामुदायिक वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम फलटण  येथे पार पडला. देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यांची अनुभूती सर्वांना यावेळी आली.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, प्रभारी गट विकास अधिकारी सतीश कुंभार व ईतर मान्यवर यांनी सहभाग घेतला यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व मुधोजी हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत समूहगायनात भाग घेतला.

भारतीय जनतेच्या राष्ट्रभावनेचा श्वास असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून देशभरात अभिमान, आदर आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शाळांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत, रस्त्यांपासून ते मैदानांपर्यंत सर्वत्र “वंदे मातरम्”चे स्वर गुंजले.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथील कला शिक्षक यांनी उमेश कुंभार यांनी वंदे मातरम् चे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे रंगीत चित्र व राष्ट्रध्वज तसेच सैनिकाचे चित्र खडूने फलकावर काढले होते. या काढलेल्या चित्राचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

१८७५ मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीत “वंदे मातरम्” ही रचना केली. हे गीत नंतर स्वातंत्र्यलढ्याचं घोषवाक्य बनलं. १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच सार्वजनिकरित्या हे गीत गायले गेले. स्वातंत्र्यानंतर यालाच राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला. आज, दीडशतकानंतरही “वंदे मातरम्”चा तोच ओज, तोच अभिमान, आणि मातृभूमीवरचं अखंड प्रेम प्रत्येक भारतीयाच्या हृदयात घुमताना दिसत आहे.

हे ही वाचा    मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे – मुख्याधिकारी निखिल जाधव

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फलटणमधील जाहीर सभेच्या दिवशीच उघड्यावर जुगार! पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात

पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली

error: Content is protected !!