सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

On: April 12, 2026 7:10 AM
Follow Us:

कराड – कराड तालुक्यातील शेनोली  रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक घटना घडली असून, चोरट्यांनी रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेस थांबवून प्रवाशांवर दरोडा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक रेल्वे लाईनवरील सिग्नलमध्ये छेडछाड केली. सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूरहून पुण्याला चालले होते. सिग्नल मधील केलेल्या बिघाडामुळे  मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेला थांबावे लागले. शेनोली स्टेशन जवळील एक किलोमीटरवर ही घटना घडली. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गाडीत प्रवेश करून तीन प्रवाशांना लक्ष्य केले.
या घटनेत सुमारे दीड तोळे सोनं आणि मोबाईल फोन लंपास करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा  अपघाताचा बनाव उघड करुन सस्तेवाडीतील खुनाला वाचा फोडण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!