सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये चक्री जुगाराचा सुळसुळाट! तरुणाई आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त; पोलिसांचे मौन आश्चर्यकारक!!

On: November 7, 2025 2:18 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण शहरात पोलिसांच्या कृपेने अवैध व्यवसायिकांनी चांदी केली असून, सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू आहे. शहरात अवैध व्यवसायांचा खुलेआम बाजार भरला आहे. मटक्याबरोबरच आता चक्री या नव्या जुगार व्यवसायाने आपली पाळंमुळं घट्ट रोवली असून, अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. दिवसभर मेहनत करून कमाविलेला पैसा तरुणाई जुगारात उडवत असल्याने त्यांच्या संसारावर आर्थिक संकट कोसळले आहे.

अवैध व्यवसायांना पोलिसांचे आशीर्वाद?

फलटण शहरातील विविध भागात अवैध व्यवसायांनी पोलिसांच्या आशीर्वादाने चांगलेच बस्तान बसवले आहे. कल्याण-मुंबई मटक्याबरोबरच चक्रीमुळे अनेक तरुण आर्थिकदृष्ट्या कंगाल झाले असून, व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या कुटुंबांचा प्रपंच धुळीस मिळत आहे. त्यामुळे फलटण शहर हे आता अवैध व्यवसायांचे माहेरघर बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चक्री जुगाराचा नेटवर्क पसरला

शहरातील काही युवकांनी आर्थिक देवाणघेवाणीतून पोलिसांच्या मदतीने शहरात तसेच तालुक्यात अनेक चक्री जुगारांचे अड्डे उघडले आहेत. खालपासून वरपर्यंत हजारोंची पाकिटे फिरत असून, या चक्री जुगारातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. कोणी नवीन जुगार अड्डा सुरू करू इच्छित असेल, तर त्याला ‘चक्री किंग’ आयडी आणि कामगार पुरवून भागीदारीत नवीन अड्डा सुरू करण्याची सुविधा देण्यात येते.फलटण शहरातील चक्री जुगार अड्ड्यांवर तरुणांची चांगलीच वर्दळ असून, ऑनलाइन पद्धतीत चालणाऱ्या या जुगारामुळे अनेक घरांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला ऑनलाईन निकाल लागणाऱ्या या खेळात एका स्क्रीनवर निकाल दाखवला जातो. टेबलवर 1 ते 10 नंबर पैकी कोणत्याही नंबरवर पैसे लावले जातात आणि काही सेकंदांत निकाल जाहीर होतो. एका तासात साधारण 60 निकाल लागतात, आणि दिवसभर लाखोंची उलाढाल सुरू असते.चक्री जुगार अड्डे खुलेआम सुरू असूनदेखील आजपर्यंत कोणतीही पोलिस कारवाई झालेली नाही, हे मोठे आश्चर्य आहे. त्यामुळे खालून वरपर्यंत सर्वांना या व्यवसायाची कल्पना असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या चक्री जुगार अड्ड्यांवर नेमकी कारवाई कोण आणि कधी करणार, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  फलटणच्या विकासासाठी रणजितदादांनी कोट्यावधीचा निधी आणल्यामुळे फलटण शहर बदलतय-विराज खराडे

शहरातील अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग झपाट्याने वाढत आहे. व्यसन आणि जुगाराच्या आहारी गेलेली अनेक मुले चक्री जुगाराच्या माध्यमातून गुन्हेगारीत अडकत आहेत. अशा मुलांकडून विविध चोरी, मारहाण, आणि अवैध व्यवहारांत वाढ होत असल्याचे पोलिसांनाच ठाऊक आहे.दिवाळीच्या काळात मटका आणि चक्री व्यवसायात नेहमीच तेजी असते. या संधीचा फायदा घेत, यावर्षी ऐन सणासुदीत नवीन चक्री अड्डे सुरू झाले आहेत. आगाऊ हप्ते भरून आणि स्थानिकांना “मूक संमती” मिळवून हे अड्डे सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

नगराध्यक्ष समशेरशिंह ना निंबाळकर यांचा प्रजासत्ताक दिनी फलटणच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प!

error: Content is protected !!