फलटण : नागेश्वरनगर येथील आढाव परिवाराने लघुउद्योग क्षेत्रात पदार्पण करत ‘आरव जनरल स्टोअर्स अँड व्हरायटीज’ या दुकानाचा शुभारंभ शेती शाळा खुंटे रोड परिसरात केला आहे.
दुकानाचे उद्घाटन प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. गोखळी येथील तानाजी जगताप यांनी व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अनिलकाका जाधव, भीमराव सावंत, बबन कदम, विवेक चव्हाण, दगडू कांबळे, प्रशांत कांबळे, मयुर सावंत, कमलाकर दगडे, अर्जुन म्हेत्रे, प्रमिला सावंत, बेबी कांबळे, प्रतिक्षा आढाव, ललिता गायकवाड, पुनम चव्हाण, पृथ्वीराज, दिक्षा, सान्वी आणि अंश उपस्थित होते. तसेच प्रियांका आढाव आणि आरव हे व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होते.
या दुकानात शालेय साहित्य, गिफ्ट आर्टिकल्स, खेळणी, गृहउपयोगी वस्तू तसेच इतर विविध वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुपुत्र तेजेश आढाव व ॲड. आकाश आढाव यांच्या प्रयत्नांमुळे व सहकार्यामुळे आई-वडिलांसाठी हा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे शिवाजीराव आढाव (मिस्त्री) व रेखा आढाव यांनी सांगितले.
यापूर्वी शिवाजीराव आढाव यांचे वडील गणपतराव आढाव यांची फलटण येथे लाकडाची वखार होती. अनेक वर्षांनंतर आढाव कुटुंबाने पुन्हा व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ग्राहकांची साथ लाभल्यास हा व्यवसाय निश्चितच वाढीस लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर तसेच मित्रपरिवाराने आढाव कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.







