सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये कर्जाच्या तगाद्यामुळे व्यावसायिकाने संपवले जीवन

On: April 25, 2026 7:23 AM
Follow Us:

फलटण – फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासो खोपडे (वय ४२) यांनी सावकारीचा तगादा, आर्थिक फसवणूक तसेच फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांनी दि. १७ एप्रिल रोजी राहत्या घरी विषारी औषध घेतले होते. त्यानंतर त्यांना फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी कोमल रवींद्र खोपडे (वय ३३) यांच्या फिर्यादीनुसार, सुरज कदम याच्याकडून घेतलेले कर्ज मोठ्या प्रमाणात फेडूनही त्याच्याकडून अधिक पैशांसाठी तगादा लावला जात होता व एका कंटेनरचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप आहे. तसेच दिगंबर भिवरकर व प्रितेश चोपडा यांनी वाहन खरेदीत फसवणूक केल्याचे, तर कृष्णा उर्फ रमेशचंद्र केशवदेव गुप्ता याने गाडीचे पूर्ण पैसे न दिल्याचे नमूद आहे. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गाड्या उभ्या करून दबाव टाकला व बँक अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना फोन करून बदनामी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये संबंधितांची नावे नमूद असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करत आहेत.

हे ही वाचा  पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या सामाजिक न्यायाचा लढा थांबू नये – सचिन साठे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!