सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत संजीवराजे व श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास केले अभिवादन

On: April 14, 2026 1:19 PM
Follow Us:

फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर व फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह ना  निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील स्मारकास अभिवादन केले. यावेळी शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच, शहरात आगमन झालेल्या ज्योतीचे स्वागत बाणगंगा नदीवरील सातारा पुलावर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अभिजीत जाधव व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते करण्यात आले. बारामती चौक व फलटण बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉपच्या वतीने अन्नदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी 6.00 वाजता मंगळवार पेठ येथून मा. विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर, मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावर्षी जयंती महोत्सवानिमित्त मंगळवार पेठ, रविवार पेठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे.
यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे Columbia University येथील लायब्ररीची प्रतिकृती उभारण्यात आली असून, नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या सजावटीमुळे जयंती मंडळाचे अध्यक्ष हरीश काकडे व सर्व जयंती मंडळाच्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संध्याकाळची भव्य मिरवणूकही पाहण्यासारखी ठरणार आहे.

हे ही वाचा  वाचन प्रेरणा घेऊन जयंती साजरी करूया – नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

error: Content is protected !!