सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

On: August 11, 2026 1:45 PM
Follow Us:

फलटण : संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त नाना पाटील चौक, फलटण येथील संत सावता माळी महाराज मंदिरात दर्शन घेऊन भाविकांनी महाराजांना विनम्र अभिवादन केले.

संत सावता माळी महाराजांविषयी संत नामदेव महाराज म्हणतात—

“धन्य ते अरण, रत्नाची खाण !
जन्मला निधान सावता तो !!
सावता सागर, प्रेमाचा आगर !
घेतला अवतार माळ्या घरी !!”

संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या अभंगातून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जातीयवाद आणि अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन केले. प्रपंच आणि शेतीच्या कामात राहून विठ्ठलभक्ती करत ‘कर्म हीच ईश्वर सेवा’ असा संदेश त्यांनी समाजाला दिला.

पुण्यतिथीनिमित्त गतवर्षीप्रमाणे यंदाही फलटण शहरात संत सावता महाराजांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा रथ पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून प्रदक्षिणेसाठी नेण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संत सावता महाराजांच्या रथाचे पूजन करून रथयात्रेचा शुभारंभ आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी भाविकांना संत सावता महाराजांच्या रथाचे तसेच महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास संत सावतामाळी मंदिर ट्रस्टचे चेअरमन मनीष जाधव, बाळासाहेब ननवरे, गोविंद भुजबळ, विकास शिंदे, बापूराव शिंदे, कुदळे, रणजित भुजबळ, सुभाष ननवरे, विक्रम शिंदे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

संत सावता माळी महाराजांच्या विचारांचा आणि भक्ती-परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या रथयात्रेला फलटण शहरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा  महाशिवरात्री निमित्त माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले स्मारकास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार

बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क – डीवायएसपी विशाल खांबे

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी;जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

तथागत गौतम बुद्ध जयंतीत वेळेचे निर्बंध; वाद्य बंद, PI अरविंद काळे यांच्यावर दुहेरी निकषाचा आरोप!

error: Content is protected !!