सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जावलीची राजनंदिनी पडर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम; सातारा जि.प. अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार

On: April 14, 2026 9:48 PM
Follow Us:

फलटण : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जावली (ता. फलटण) येथील कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान विचारवंत या विषयावर तिने ओघवत्या व प्रभावी शैलीत मनोगत व्यक्त करत परीक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद दरवर्षी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करते. यावर्षीही या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी (आंदरूड) केंद्र जावली येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी राजनंदिनीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही राजनंदिनीने आक्रमक व प्रभावी शैलीत भाषण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियांका महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, शिक्षण सभापती सौ. तेजस्विनी विक्रम कदम, कृषी सभापती सौ. लता कर्णे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, शबनम मुजावर तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
राजनंदिनी ही उत्तम वक्ता असून राज्यभर विविध शासकीय व खाजगी स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचा  मुधोजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संघर्षातून साकारलेले यशाचे शिखर : सौ. संध्या गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रवास
वाढदिवसानिमित्त विशेष लेख

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची ‘अनया पवार ‘भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

मुधोजी हायस्कूल चे १० वी (एसएससी) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश; निकालामध्ये मुलींची सरशी; विद्यालयाचा निकाल ९३.७२%

वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपला; तीन बंधूंनी शाळेला दिली खेळ साहित्याची भेट

मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली, मुलींनीच मारली बाजी!

error: Content is protected !!