फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील इयत्ता दहावी (एसएससी) बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत उज्ज्वल लागला असून विद्यालयाने यंदाही गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
सन २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेस विद्यालयातील एकूण ७३३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल ९३.७२ टक्के लागला आहे.
यामध्ये १८५ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, २६० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १७९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ६३ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी प्राप्त केली आहे.
निकालामध्ये मुलींनी विशेष बाजी मारली असून प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत —
🔹 प्रथम क्रमांक (संयुक्तपणे)
कु. जान्हवी हंबीर लांडगे — ४८२/५०० (९६.४०%)
कु. सई रामदास शिंदे — ४८२/५०० (९६.४०%)
🔹 द्वितीय क्रमांक
कु. वेदांतिका विकास कणसे पाटील — ४७२/५०० (९४.४०%)
🔹 तृतीय क्रमांक
कु. श्रेया नितीन कदम — ४६८/५०० (९३.६०%)
या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशालेचे नाव उज्ज्वल करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विषयात १०० पैकी १०० गुण
संस्कृत विषयात कु. सई रामदास शिंदे हिने १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच गणित विषयात आर्यन रूपचंद शिंदे, आदित्य संदीप बोडके व मयंक स्वप्निल दोशी यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत दैदिप्यमान कामगिरी केली.
या यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुधोजी हायस्कूल चे १० वी (एसएससी) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश; निकालामध्ये मुलींची सरशी; विद्यालयाचा निकाल ९३.७२%
By Team LBNN
On: May 9, 2026 8:37 AM











