सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण नगरपालिकेच्या अभ्यासिकेत वृत्तपत्रांचा अभाव ; ३-४ महिन्यांपासून वृत्तपत्र बंद; कर्मचारीही गैरहजर

On: April 25, 2026 3:49 PM
Follow Us:

फलटण – फलटण नगरपालिकेच्या बादशाही मशीद शेजारी असलेल्या कै. भाऊसाहेब जिजाजीराव जाधव वाचनालय व रात्र अभ्यासिका येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकही वृत्तपत्र उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता, अभ्यासिकेत नगरपालिकेचा एकही कर्मचारी ड्युटीवर उपस्थित नसल्याचेही निदर्शनास आले.
या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्र अत्यावश्यक असताना मागील चार महिन्यांपासून येथे एकही वृत्तपत्र येत नाही. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर थेट परिणाम होत आहे. वाचनालय आणि अभ्यासिका ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सुविधा असूनही मूलभूत सोयींचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, समोरच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयात नियमित वृत्तपत्रांची सोय उपलब्ध आहे. त्याच्या तुलनेत नगरपालिकेच्या अभ्यासिकेत केवळ बैठकीची व्यवस्था असून माहितीपर साधनांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. तसेच, फलटण नगरपालिकेच्या वाचनालयाच्या दर्शनी भागावर वेळापत्रक, सुट्टीचे दिवस याबाबत कोणतीही माहिती लावलेली नाही. स्वामी विवेकानंद वाचनालयालाही भेट दिली असता, ते सकाळी साडे अकराच्या सुमारास बंद असल्याचे दिसून आले, मात्र कामकाजाची स्पष्ट माहिती दर्शनी भागात  उपलब्ध नव्हती.
फलटण शहर व तालुक्यात सुमारे ६५ वाचनालये असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असताना, त्यापैकी किती वाचनालये प्रत्यक्षात कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवश्यक सुविधा देत आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभाग, अधिकारी व प्रशासन  या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा  संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संघर्षातून साकारलेले यशाचे शिखर : सौ. संध्या गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रवास
वाढदिवसानिमित्त विशेष लेख

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची ‘अनया पवार ‘भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

मुधोजी हायस्कूल चे १० वी (एसएससी) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश; निकालामध्ये मुलींची सरशी; विद्यालयाचा निकाल ९३.७२%

वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपला; तीन बंधूंनी शाळेला दिली खेळ साहित्याची भेट

मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली, मुलींनीच मारली बाजी!

error: Content is protected !!