
बीड कारागृहात अजिंक्य चांदणे यांचे प्रबोधन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कैद्यांना मार्गदर्शन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा कारागृहात विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी कैद्यांना मार्गदर्शन करत लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार मिळाला आहे. लोकशाही असल्यामुळे न्याय मिळत.
तसेच त्यांनी कैद्यांना आत्मपरीक्षणाचा संदेश देत सांगितले की, “कारागृह म्हणजे स्वतःला शोधण्याचे ठिकाण आहे. येथे असताना आपण आपल्या चुका ओळखून, त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी भूषविले. कार्यक्रमात उपस्थित कैद्यांशी संवाद साधताना अनेक भावनिक क्षणही पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देत, “लवकरच बाहेर भेटू” अशी आशा व्यक्त करण्यात आली.










