सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई स्कूलचा १० वी निकाल ९९.१०% ; विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

On: April 16, 2026 9:29 PM
Follow Us:


फलटण -फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता १० वी चा निकाल ९९.१०% इतका लागला असून, परीक्षेस बसलेल्या ११२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १११ विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम क्रमांक कु. तुलसी बाळासाहेब जठार हिने ९७.६% गुण मिळवत पटकावला. द्वितीय क्रमांक कु. पूर्वा पराग घनवट आणि रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे यांनी प्रत्येकी ९७% गुणांसह संयुक्तरीत्या मिळवला. तृतीय क्रमांक शिवम रविकिरण राऊत आणि कु. श्रावणी सोमनाथ पवार यांनी ९६.६% गुणांसह संयुक्तरीत्या मिळवला.
विशेष बाब म्हणजे, ११२ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ३२ आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी विषयासाठी रुबिना बागवान, हिंदीसाठी शीतल भोसले, इंग्रजीसाठी प्रीती एकल, गणितासाठी कै. तुकाराम शेलार, विज्ञानासाठी मयुरा फणसे, नूतन खेडकर व सुनिता नाईक निंबाळकर, समाजशास्त्रासाठी अर्चना काटकर व वर्षा खोमणे तसेच AI/IT साठी दीपज्योती दंडिले, चांदणी कदम व आयेशा पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्या मिनल दिक्षित, उपप्राचार्या स्नेहल भोसले, पर्यवेक्षिका प्रियांका जठार व अर्चना काटकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा  “आम्ही माणूस आहोत, तर माणुसकीचे जग तयार करणे गरजेचे” - इंद्रजीत देशमुख (काकाजी)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संघर्षातून साकारलेले यशाचे शिखर : सौ. संध्या गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रवास
वाढदिवसानिमित्त विशेष लेख

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची ‘अनया पवार ‘भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

मुधोजी हायस्कूल चे १० वी (एसएससी) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश; निकालामध्ये मुलींची सरशी; विद्यालयाचा निकाल ९३.७२%

वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपला; तीन बंधूंनी शाळेला दिली खेळ साहित्याची भेट

मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली, मुलींनीच मारली बाजी!

error: Content is protected !!