सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

‘माझा भारत हा खूप बलशाली बनणार आहे’ – प्राचार्य रवींद्र येवले

On: August 18, 2026 11:25 AM
Follow Us:

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

फलटण, कोळकी : सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य रवींद्र येवले म्हणाले, “हे विद्यार्थी म्हणजे उद्याचा बलशाली भारत आहेत. त्यामुळे माझा भारत हा खूप बलशाली बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या चार्टर्ड प्रेसिडेंट सौ. नीलम पाटील, सौ. प्रीतम पाटील, कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. अशोक नाळे, लोकध्यासचे संपादक राजकुमार काकडे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भुजबळ, मनोज पवार, स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आदिती गवारी हिने स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले.

प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी ‘पवित्रतेचा पुण्याईचा आमचा भारत देश’ तसेच ‘वो देश मेरे, तेरे शान के सदके’ या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. इयत्ता दुसरीतील दुर्गेश सोनवलकर याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी भाषण केले. यूकेजीतील गार्गी बळीप हिने महात्मा गांधी, तन्वी पोळ हिने पंडित जवाहरलाल नेहरू, तर इयत्ता पहिलीतील रियांश पायसोडे याने भगतसिंग यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

हे ही वाचा  फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची 'अनया पवार 'भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी नारीशक्तीविषयी जनजागृती करणाऱ्या नाटिकेचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पिरॅमिड प्रात्यक्षिकानेही कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी सौ. नीलम पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षक, विद्यार्थी व पालकांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करत त्यांनी प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी १,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्स भेट दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गोसावी यांनी केले, तर तेजश्री बळीप यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!