सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपला; तीन बंधूंनी शाळेला दिली खेळ साहित्याची भेट

On: May 6, 2026 8:41 AM
Follow Us:

फलटण – जाधववाडी (फ) येथील कै. सुरेश धोंडिबा जमदाडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य भेट देत अनोख्या पद्धतीने स्मृतिदिन साजरा केला. अजित सुरेश जमदाडे, सुजित सुरेश जमदाडे आणि शक्ति सुरेश जमदाडे या तिन्ही बंधूंनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शहाजी जाधव यांच्याकडे साहित्य सुपूर्त केले.
कै. सुरेश जमदाडे हे प्रामाणिक, वक्तशीर आणि शिस्तप्रिय बांधकाम व्यावसायिक म्हणून फलटण, माण, माळशिरस व बारामती तालुक्यात परिचित होते. त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत “समाजाचे काही देणे लागतो” ही भावना जपत त्यांच्या मुलांनी हा उपक्रम राबविला.
१ मे २०२६ रोजी शाळेचा निकाल असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रिकेट साहित्य, फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ पट, साप-शिडी तसेच इतर खेळ साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
“विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळातून आरोग्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल,” असे मत कै. सुरेश जमदाडे यांचे थोरले चिरंजीव अजित जमदाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच नानासाहेब जमदाडे, महेश जमदाडे, माधव जमदाडे, हिम्मतराव जाधव, ग्रामस्थ, पालक व मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा  कृतिशील शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास : वसुंधरा नाईक निंबाळकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!