सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा रोड जागा प्रकरण ; आमच्या जागेबाबत न्याय न मिळाल्यास हजारोंचा मोर्चा काढणार – रामभाऊ मदने

On: May 23, 2026 11:28 AM
Follow Us:

फलटण : कोळकी ता. फलटण येथे रामभाऊ मदने यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सातारा रोडवरील जागेच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच आम्हाला संविधानिक पद्धतीने न्याय द्यावा, अन्यथा हजारोंच्या संख्येने फलटणमध्ये मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सदर जागेबाबत लिंगायत समाजाकडून “ही जागा पूर्वीपासून स्मशानभूमीची असून आमच्या ताब्यात आहे,” असा दावा करण्यात आला आहे. त्यावर रामभाऊ मदने यांनी “ही जागा आमच्या पूर्वजांची असून त्यासंबंधी सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत,” असे सांगितले.

यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले :

जुना सर्वे नंबर 519 हा फेरफार व पुनर्मोजणीनंतर नवीन सर्वे नंबर 64 असा झाला असून क्षेत्र 25 एकर 16 गुंठे आहे. सन 1955 मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गणपती मदने यांना सदर जमीन वाटप करण्यात आली होती. त्यासाठी शासनाकडे 1050 रुपये भरल्याची पावती उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला.

सन 1955 पासून आजपर्यंत सातबारा उताऱ्यावर स्मशानभूमीची कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. दिनांक 23 मार्च 2026 रोजी झालेल्या मोजणीवर हरकत घेतली असून त्याची सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा रोड पुलासाठी सन 1960 मध्ये मुरूम काढण्याकरिता सुमारे 5 एकर जागा दिल्याचा पुरावा असल्याचा दावा करण्यात आला. तसेच सर्वे नंबर 519 मधील 16 गुंठे जागा कॉलेजसाठी देण्यात आली असून त्याचा फेरफार क्रमांक 81/26 असल्याचे सांगण्यात आले.

जमिनीवर मालकी हक्क सांगणाऱ्यांनी अधिकृत दस्तऐवज सादर करावेत, अशी मागणी करण्यात आली. संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे सातबारा दुरुस्तीबाबत अर्ज दिला असून त्यावर फलटण एज्युकेशन  सोसायटी यांनी 24 जुलै 2024 रोजी सादर केलेल्या म्हणण्यात “25 एकर कॉलेजची जागा वगळून उर्वरित जमीन मदने यांच्या नावावर करण्यात यावी,” असे नमूद केले आहे असे सांगितले .

सदर जागा आमची असून या बाबत महसूल प्रशासन व महसूल मंत्र्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगत प्रशासनाने न्याय न दिल्यास मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रामभाऊ मदने यांनी दिला.

हे ही वाचा  पालखी मार्गासाठी नितीन गडकरींच्या मोठ्या घोषणा; फलटणला ₹97 कोटींच्या विकासकामांची भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!