सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मला धमकी आल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं? – तुकाराम मुंडे

On: June 13, 2026 7:44 PM
Follow Us:

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्वतःला सध्या धमक्या येत असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण देत या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भेसळखोरीविरोधातील धडक कारवायांमुळे त्यांना धमक्या मिळत असल्याच्या चर्चा सुरू असताना पत्रकार परिषदेत त्यांनी यावर थेट भूमिका मांडली.

पत्रकारांनी धमकीबाबत प्रश्न विचारल्यानंतर मुंडे म्हणाले, “मला धमकी आल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं? व्हायरल होत असलेली ती क्लिप साधारण १० वर्षांपूर्वीची जुनी आहे.” त्यांनी सध्या कोणतीही नवीन धमकी मिळाल्याचा दावा फेटाळून लावत, जुन्या व्हिडिओचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने दिला जात असल्याचे स्पष्ट केले.

अलीकडील काळात अन्नभेसळ, बनावट उत्पादने तसेच गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूविरोधातील कारवायांमुळे त्यांची भूमिका चर्चेत आहे. मात्र, सध्या धमक्या येत असल्याच्या बातम्यांना त्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा काही माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या दाव्यांपेक्षा त्यांच्या अधिकृत स्पष्टीकरणालाच महत्त्व असल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.

हे ही वाचा  सातारा जिल्हा रुग्णालयातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात नागरिकांची गैरसोय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!