फलटण( संतोष सोनवलकर)- सोनवडी खुर्द-बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा दि. १७ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी श्री. बबनराव संभाजी गोडसे यांची सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी लांडे साहेब होते. त्यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली. निवड जाहीर होताच गावातील शेतकरी व सभासदांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी संचालक मंडळातील राजेंद्र राऊत, संदीप सोनवलकर, गणपत सोनवलकर, आप्पासो सूर्यवंशी, महादेव मोरे, दशरथ पवार, जाणारे सोनवलकर, बाळासो शिंदे, रामदास केंजळे, विश्वनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन बबनराव गोडसे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. खत, बियाणे, पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देणे तसेच शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गावातील सभासद व ग्रामस्थांनी बबनराव गोडसे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सोनवडी खुर्द-बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी बबनराव गोडसेंची बिनविरोध निवड
By Team LBNN
On: May 19, 2026 8:46 AM










