सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला

On: June 15, 2026 7:21 PM
Follow Us:

जयपूर –  NEET पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर राजस्थानातील जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात आयोजित आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपके आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर समर्थकांसह मंचाकडे जात असताना गर्दीतून काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हल्ल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर प्रतिक्रिया देत हिंसेचा निषेध केला. त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडत समर्थकांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले.

अभिजीत दिपके हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे तसेच पुण्यात विद्यार्थ्यांसह आंदोलने आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, जयपूरमधील हल्ल्याप्रकरणी नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींबाबत अधिकृत तपास सुरू असून, त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलिस चौकशीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अभिवादन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!