आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लोकशाही भारत न्यूज नेटवर्क तर्फे ‘आषाढी एकादशी विशेषांक २०२६’ काढण्यात आला आहे. पत्रकारितेच्या पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना वाचकांना वारकरी संप्रदाय, संतपरंपरा आणि भक्तीचा संदेश देणारा हा विशेषांक सादर करण्यात आला आहे.
या विशेषांकामध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीचा संदेश, संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘पसायदान’ व त्याचा सोपा अर्थ, संत तुकाराम महाराजांचे प्रेरणादायी विचार, संत गाडगेबाबांची दशसूत्री, आजच्या तरुणांसाठी वारीचा संदेश तसेच भक्ती, समाजप्रबोधन आणि मानवतेची शिकवण देणारे अनेक माहितीपूर्ण लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.
विशेषांकातून भक्तीबरोबरच समता, सेवा, माणुसकी, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. वारकरी परंपरेचा इतिहास, संतांचे विचार आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता साध्या व सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.
“भक्तीचं एक मोठं स्थान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. इथे काहीच मागितलं जात नाही; इथे फक्त असते निरागस भक्ती, अढळ श्रद्धा आणि विश्वास. पंढरपूरच्या विठ्ठलासह संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ते संत गाडगेबाबा या महान संतांच्या विचारांबद्दल मला मनापासून आदर आहे. त्यांच्या शिकवणीतूनही समाजाला प्रेम, समता, सेवा आणि माणुसकीची प्रेरणा मिळते. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनात सदाचार आणि मानवतेचा प्रकाश नांदो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.”
भक्ती, संस्कृती आणि संतपरंपरेचा समृद्ध वारसा जपणारा ‘आषाढी एकादशी विशेषांक २०२६’ वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आला असून, वारकरी परंपरेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, आमचे असंख्य वाचक, दर्शक,हितचिंतक, बातमीदार आणि जाहिरातदार यांचे मनःपूर्वक आभार!
आषाढी एकादशीच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
संपादक – श्री. सागर चव्हाण












