ज्या पांडुरंगामुळे आपण….
त्या पांडुरंगाला काय बरं भेट द्यावी?
त्याची वारी घडण्यासाठी
असावी लागते
जन्मजन्माची पुण्याई…
त्या वारकऱ्यांची ओंजळ भरावी
त्यास माऊली माऊली म्हणत
थोडी वारी आपली ही घडावी…
तुळशी माळ गळा…
कपाळी चंदनाचा टिळा…
मुखी पांडुरंगाचे अखंड नाम…
आता आयुष्यभराचे हेच काम…
ना तहान भुकेची पर्वा…
मिळेल त्या जागेवर लागते झोप…
कसे हे आगळे प्रेम वारकऱ्यांचे पांडुरंगावर…!
लाखो पावले चालती
फक्त एक नजर हवी पांडुरंगाची…
काय मिळतं या आषाढी दिंडीत?
कोणता अखंड ध्यास असतो मनात?
चालली पावले पंढरीच्या दारी…
पहाया विठ्ठल उभा विटेवरी…
पण वारीतच भेटतो विठ्ठल प्रत्येकास वेगवेगळ्या रूपात…
देतो तो दर्शन त्याच्या प्रत्येक भक्तास
विठ्ठलास पाहण्याची आस l
हाच प्रत्येक व्यक्तीला लागला ध्यास
सावळे ते रूप
तेजोमय मुख
पाहण्यासाठी लाखो भाविक
दरसाल चालती
पंढरीची वाट
हे विठ्ठला एकच कर
तुझ्या भक्तीचा विसर
कधी न यावा मनात
रहावे तुझे नाम मुखात..
!!बोला जय जय राम कृष्ण हरी!!
कवयित्री – सौ सुषमा भरत राऊत
प्राथमिक शिक्षिका कराड.
मोबाईल नंबर -9421419738
कविता -विठ्ठल
By Team LBNN
On: July 25, 2026 10:38 AM










