सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सौ. प्रतिभाताई शिंदे व श्री. चेतन शिंदे यांच्या हस्ते ‘लोकशाही भारत न्यूज’च्या आषाढी एकादशी विशेषांकाचे प्रकाशन

On: July 29, 2026 11:20 PM
Follow Us:

फलटण : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लोकशाही भारत न्यूज तर्फे “आषाढी एकादशी विशेषांक 2026” हा विशेषांक प्रथम 25 जुलै 2026 रोजी ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर या विशेषांकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

फलटण येथील ‘जिद्द’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे तसेच फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. चेतन सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत , शेतकरी व कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची विठू माऊली तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याप्रती असलेल्या श्रद्धा, भक्ती आणि आदरभावनेतून हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.

या विशेषांकामध्ये आषाढी वारीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, वारीचे वैशिष्ट्य तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या थोर विचारांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. भाविक, वारकरी आणि वाचकांना संतविचारांचा प्रेरणादायी संदेश मिळावा, हा या विशेषांकामागील प्रमुख उद्देश आहे.

हे ही वाचा  आषाढी एकादशी : "भक्ती, समता आणि आत्मजागृतीचा महाउत्सव"

यावेळी अक्षय सस्ते, राणा प्रताप भोसले उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!