सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

विठ्ठला

On: July 25, 2026 10:48 AM
Follow Us:

डोळ्यांच्या या अथांग महासागराला,
विठ्ठला सदा व्हावे तुझेच रे स्मरण!
उषःकाली घडो तुझीच भक्ती अन्,
करावे मी,केवळ तुझेच रे नामस्मरण!

तुझ्याचसाठी हा देह अखंड झिजावा,
मनात माझ्या सदैव विठ्ठल जागावा!
मी करता, पूर्ण हरीपाठ वाचन, चिंतन
तेव्हा, हे विठ्ठला तूच दृष्टीस दिसावा!

हे सावळ्या पांडुरंगा ये धावून सत्वरी,
घे सांभाळून लेकरा झाल्या चुका जरी!
नाहीच विसरणार कधी तुला हे देवा,
फक्त एकदा’तू माझा भक्त’हे म्हण तरी!

विटेवरी तू उभा सदैव माझा विठुराया,
माझा प्राण तुझिया चरणी हे पंढरीराजा!
तुझ्या भक्तीने पावन होई हे सर्व वारकरी,
अन् धन्य धन्य होई हो तुझीच ही प्रजा!

कधी होतोस आई, कधी होतोस बाप,
तारण्या संकट भक्ताचे,घेतो गरूड भरारी!
होतो सदा, घरोघरी अन् दारोदारी विठ्ठला,
हरीनामाचा अखंड जागर या चराचरी!

#स्नेहसखी
स्नेहल मिना मधुकर कदम
खानापूर, सांगली.

हे ही वाचा  वारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!