फलटण : फलटण तालुक्यातील नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार होणार आहे. या वेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या प्रलंबित समस्या व तक्रारींवर संबंधित विभागांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येणार आहे.
फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या अथवा तक्रारी आवश्यक कागदपत्रांसह आमदार सचिन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा कराव्यात. जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या व तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.
तक्रार अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :
आमदार सचिन पाटील जनसंपर्क कार्यालय, महाराजा मंगल कार्यालयाजवळ, फलटण.
फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन
By Team LBNN
On: August 14, 2026 4:40 PM












