सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पालखी सोहळ्यापूर्वी रस्ते व पाईपलाईन कामे पूर्ण करण्याचे नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे आदेश

On: May 20, 2026 7:13 PM
Follow Us:

फलटण : आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पालखी मार्गावरील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फलटण नगरपरिषदेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीस मुख्याधिकारी निखिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, नगरसेवक रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक अनुप शहा तसेच संबंधित कंत्राटदार प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालखी मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी आगमनापूर्वी उखडण्यात आलेले सर्व रस्ते तातडीने पूर्ण करावेत, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. तसेच पालखी सोहळा संपेपर्यंत शहरात नवीन रस्ते खोदकामास बंदी घालण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या व्यवस्थित आणि सुरक्षितरीत्या भरण्याचे आदेश देण्यात आले. कामांदरम्यान पाणीपुरवठा किंवा इतर पाईपलाईन फुटल्यास नगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदारांनी समन्वय साधून तात्काळ दुरुस्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

पालखी मार्गालगत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईपलाईनची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. शहरातील विकासकामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही नगराध्यक्षांनी दिला.

या बैठकीतील स्पष्ट निर्देशांमुळे पालखी मार्गावरील रखडलेली कामे वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा  फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी

मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !

फलटणमध्ये चायना मांजामुळे माजी सैनिकाचा गळा कापला; पतंगप्रेमी चायना मांजा वापरणार की टाळणार?

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत उद्या फलटणमध्ये वॉर्ड सभा

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

error: Content is protected !!