सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये चायना मांजामुळे माजी सैनिकाचा गळा कापला; पतंगप्रेमी चायना मांजा वापरणार की टाळणार?

On: August 5, 2026 8:54 PM
Follow Us:

फलटण : रंगपंचमीच्या निमित्ताने फलटण शहरात मोठ्या उत्साहात पतंगोत्सव साजरा केला जातो. मात्र या उत्सवाला दरवर्षी चायना मांजामुळे अपघातांचे गालबोट लागत आहे. बंदी असतानाही अनेकांकडून चायना मांजाचा वापर होत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

आज डेक्कन चौक परिसरातून प्रवास करत असताना जाधवाडी येथील माजी सैनिक शिवाजी मुगुटराव बुधावले (वय ५१) यांच्या गळ्याला चायना मांजा लागून गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्यांच्या गळ्यावर आठ टाके घालावे लागले.

दरवर्षी चायना मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, पक्षी आणि इतर नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत असतानाही काही पतंगप्रेमी या धोकादायक मांजाचाच वापर करत आहेत. प्रशासनाकडून जनजागृती आणि कारवाई होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

रंगपंचमीचा आनंद साजरा करताना चायना मांजाऐवजी साध्या सुती मांजाचा वापर करणे ही प्रत्येक पतंगप्रेमीची जबाबदारी आहे. प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता नागरिकांनी स्वतःहून चायना मांजावर बहिष्कार टाकल्यास अशा गंभीर दुर्घटना टाळता येऊ शकतात.

चायना मांजा हा केवळ नियमभंगाचा विषय नसून तो थेट जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य देत चायना मांजाचा वापर पूर्णपणे टाळणे हीच काळाची गरज आहे.

हे ही वाचा  मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी

मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत उद्या फलटणमध्ये वॉर्ड सभा

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

क्रांतिसिंह नाना पाटील गृहरचना संस्थेच्या सदस्यांना आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी; परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” नाव देण्याचाही आग्रह

error: Content is protected !!