फलटण : लोकमान्य उद्योग समूहाच्या लोकमान्य पतसंस्था व सूर्या एचपी गॅस एजन्सीच्या वतीने फलटण डॉक्टर असोसिएशनच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले . त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लोकमान्य उद्योग समूहाचे प्रमुख तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचे आवाहन केले.
“देशाला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहून ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे. आपण सर्व वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहिलो, तर देशाकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत राहणार नाही,” असे प्रतिपादन डॉ. बी. के. यादव यांनी केले.
यावेळी फलटण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निनाद दोशी, उपाध्यक्ष डॉ. शिल्पा गांधी, सचिव डॉ. निखिल गांधी, खजिनदार डॉ. सागर तेली, डॉ. अलोक गांधी,साहित्यिक सुरेश शिंदे, परिस स्पर्श फाउंडेशनच्या शबाना पठाण, प्रा. लियाकत शेख, डॉ. बालगुडे, प्रा. जी. एम. जाधव, श्री. डांगे मामा, लोकमान्य पतसंस्थेचे संचालक श्री. बनसोडे, डॉ. सी. एम. यादव, डॉ. अमित मोरे, राजेंद्र घनवट, तसेच लोकमान्य उद्योग समूहाचे मॅनेजर श्री. अमोल जगताप यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. देशाची एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
फलटण डॉक्टर असोसिएशनच्या उपस्थितीत लोकमान्य उद्योग समूहातर्फे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By Team LBNN
On: August 15, 2026 1:35 PM









