फलटण – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर परिषद शाळा क्रमांक ३ फलटण येथे आज ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी फलटण नगर परिषदेचे आरोग्य सभापती विद्यमान नगरसेवक माननीय सचिन अहिवळे सर ,विद्यमान नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, नगरसेविका , मीना जीवन काकडे,समाजसेवक हरीश आप्पा काकडे तसेच आप्पा सरगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये व देशाप्रती असलेली कर्तव्यभावना यावर ओजस्वी व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषाने भारावून गेला.
माननीय नगरसेविका सुपर्णा अहिवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . तसेच मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पधेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी G. K. ऑनलाईन शॉप तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. मोरे सर यांनी केले . या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी .मुकाडे सर, बंडू यादव सर, शिवाजी जाधव सर , चैत्राली अहिवळे मॅडम, सारिका काकडे मॅडम, अंबिका काकडे मॅडम उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर भाषणांनी रंगला सोहळा
By Team LBNN
On: August 16, 2026 8:01 AM









