सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या १९ शिफारशींसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा विधानभवनात आढावा

On: August 19, 2026 10:32 PM
Follow Us:

मुंबई : क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आढावा बैठक पार पडली. या बैठकीत क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित १९ शिफारशी, तसेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, योजनांना शासनाची मान्यता मिळवून देणे आणि संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सचिन अहिर यांनी दिल्या.

यावेळी इतर मागासवर्गीय संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, आर्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी मारोती वाडेकर, नारायण गायकवाड, कैलास खंदारे, नामदेव साठे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा  मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मे पासून वाहतुकीसाठी खुला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!