सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संतोष दुबळेचा कातरखटाव गावातील दोन कुटुंबांना वारंवार नाहक त्रास!!

On: May 13, 2026 7:53 AM
Follow Us:

वडूज – कातरखटाव येथील काही कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याचे शेड उभारून निवारा, पशुपालन व शेळीपालन व्यवसाय करत आहेत. मात्र गावातील संतोष दुबळे नामक व्यक्ती वारंवार या कुटुंबांना त्रास देत असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.

भीमराव दुबळे यांच्या कुटुंबाचा आरोप आहे की, संतोष दुबळे हे “शेड व निवारा काढून टाकू” अशी धमकी देत असून, गावातील काही व्यक्तींना घेऊन संबंधित जागा अतिक्रमण असल्याचे सांगत दबाव टाकत आहेत. तसेच शिवीगाळ व धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी वडूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचे संबंधित कुटुंबाने सांगितले. तक्रारीनंतरही “तुमच्याकडे बघून घेईल” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, संतोष दुबळे हे कोणतेही लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी नसल्याचेही संबंधितांनी स्पष्ट केले आहे. तसेच गावातील दुसऱ्याच्या मालकीच्या जागेत साईबाबा मंदिर उभारल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा  फलटण येथे शनिवारी आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर राज्य सरकारची सकारात्मक भूमिका; आझाद मैदानातील मातंग समाजाचा निर्धार मोर्चा लेखी आश्वासनानंतर तात्पुरता स्थगित

सातारा जिल्ह्यातून हजारो मातंग समाजासह इतर घटक समाजातील बांधव मुंबईच्या सामाजिक न्याय महामोर्चात सहभागी होणार

मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणावर ठाम; फलटणमध्ये 20 सप्टेंबरला तालुकास्तरीय बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे

आरक्षण उपवर्गीकरण हा संविधानिक न्याय; मातंग समाज आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा इतिहास नोंद घेईल : अजिंक्य चांदणे

फलटण येथे शनिवारी आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद

error: Content is protected !!