लोकशाही भारत न्यूज प्रस्तुत ‘आद्य दीपोत्सव – दिवाळी विशेषांक २०२६’ हा लेखक आणि कवींच्या साहित्याने परिपूर्ण होत असताना, आता चित्रकार आणि कलाप्रेमींनाही या विशेषांकात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या विशेषांकासाठी कलाकारांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेली हस्तनिर्मित चित्रे, दिवाळीची चित्रे, निसर्गचित्रे, वास्तववादी चित्रे तसेच समाजप्रबोधनपर चित्रे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्जनशीलता व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक संदेश वाचकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
लेखक, कवी आणि कलाकारांच्या साहित्यिक व कलात्मक योगदानातून दिवाळी विशेषांक अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इच्छुक कलाकारांनी आपल्या चित्रांसोबत संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवावा. चित्रे पाठविण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२६ असून, प्राप्त कलाकृतींपैकी विशेषांकात कोणत्या चित्रांचा समावेश करायचा, याचा अंतिम निर्णय संपादकीय विभागाचा राहणार आहे.
‘आद्य दीपोत्सव – दिवाळी विशेषांक २०२६’च्या माध्यमातून साहित्य, कला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमात कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकशाही भारत न्यूजच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हाट्सअप क्र. 9370729808






