सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सापडलेला मोबाईल परत देत मानवतेचा संदेश; कष्टकरी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाश्रू!

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:

फलटण : मानवतेचा स्पर्श दाखवणारी एक घटना आज फलटण शहरात पाहायला मिळाली. पहाटेच्या वेळेस सापडलेला मोबाईल मूळ मालक श्री. निलेश बाबुराव धायगुडे (व्यवसाय – ट्रक ड्रायव्हर) यांना परत देत लोकशाही भारत न्यूज नेटवर्कचे संपादक सागर राजेंद्र चव्हाण यांनी एक सामाजिक आदर्श घालून दिला.

पहाटे सुमारास सापडलेला मोबाईल ओळख पटवून परत देण्यात आला. मोबाईलचा मालक भेटल्यानंतर समजले की तो मोबाईल एका मेहनती ट्रक ड्रायव्हरचा होता. मोबाईल परत मिळाल्यावर भावनाविवश झालेल्या धायगुडे यांनी “धन्यवाद!” एवढेच शब्द उच्चारले आणि भावनिक होत मोबाईल परत दिल्याबद्दल गळाभेट घेतली . त्यांनी चहा-पाणी करण्याचा आग्रह धरला पण त्याच वेळी “आता माझ्याकडे पैसे नाहीत” असे प्रामाणिकपणे सांगितले. त्यांच्या साधेपणाचे आणि मनापासूनच्या कृतज्ञतेचे दर्शन घडले.

सागर चव्हाण यांनी हसतच सांगितले, “राहू द्या, काही अडचण नाही. मोबाईल परत देण्याचं समाधान हेच माझं चहापाणी आहे.”
धायगुडे यांनी पुढे म्हणाले, “पुन्हा भेटूया, फोन करतो तुम्हाला,” आणि त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमूल्य होता.

हे ही वाचा  नगरपालिका निवडणूक निकालाच्या दिवशी फलटणचा आठवडी बाजार रद्द

ही घटना आज दुपारी फलटण शहर पोलीस ठाण्यासमोरील परिसरात सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाच्या कव्हरेजदरम्यान घडली. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या फलटणमधील काही ज्येष्ठ पत्रकारांनी या मानवतेच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळवला. फोटोमध्ये पत्रकार सागर चव्हाण हे मूळ मालक श्री निलेश बाबुराव धायगुडे यांना मोबाईल देत असताना या सोबतच दैनिक प्रभात चे पत्रकार अजय माळवे, दैनिक पुण्यनगरी चे यशवंत खलाटे पाटील, दैनिक सामनाचे सुरेंद्र ननावरे, श्रीहरी सुभाषितचे सुभाष भांबुरे, फलटण दर्शन चे सुधीर अहिवळे, सातारा टुडेचे संजय गायकवाड, AVB माझाचे विजय भिसे, ज्यांनी हा आपल्या कॅमेरा मध्ये क्षण कैद केला ते म्हणजे महाराष्ट्र माझा चे विक्रम चोरमले आदींसह उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

श्रीराम साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवर ६ जुलै रोजी सभासदांची बैठक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

फलटणमध्ये आम्हाला रेडीमेड शिवसेना मिळाली,श्रीमंत संजीवराजे आमदार झाले तर आनंदच – मंत्री उदय सामंत

error: Content is protected !!