सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे

On: September 15, 2026 2:05 PM
Follow Us:

पंढरपूर  – संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाणं ( पंजाब ) या सुमारे 2,500 किलोमीटर रथयात्रा व सायकल वारीत भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी केले आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमेटी घुमाणं व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी अशी सुमारे एक महिन्याची संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी काढण्यात येते. वारीचे हे पाचवे वर्ष आहे.
यंदा 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2026 अशी रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश अशा आठ राज्यातील सुमारे 50 मोठया शहरांतून व 500 पेक्षा अधिक ग्रामीण खेड्यातून ही अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडविणारी सायकल वारी काढली जाते. या सायकल वारीच्या माध्यमातून शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. तसेच पर्यावरणाचा संदेश दिला जातो . या सायकल वारी मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जातं नाही. सायकल यात्रींना दोन टी शर्ट, दररोज चहा, नास्ता, भोजन व निवास व्यवस्था मोफत पुरविण्यात येते. अधिक माहितीसाठी भागवत धर्म प्रसारक मंडळ,  सुमित्रा प्लाझा, वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर मो. 9822023564 या कार्यालयाशी 30 सप्टेंबर पूर्वी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी असे आवाहन भिसे यांनी केले आहे.

हे ही वाचा  तलवार गेली आणि लेखणी आली,” या लेखणीच्या बळावर महात्मा फुलेंनी समाजजागृती केली; डॉक्टर बी. के. यादव 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

सोमवार पेठेतील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम; एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

error: Content is protected !!