सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

“मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहीत; पानंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला” – आमदार सचिन पाटील

On: April 10, 2026 1:35 PM
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान टप्पा क्र. 1चे उद्घाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाधान शिबिर राबवण्याचे फेब्रुवारीपासून ठरवले आहे. हे शिबिर अधिक व्यापक झाले आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय साधून सर्व सेवा एकाच छत्राखाली देण्याचे उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या कामांसाठी शेतकऱ्यांना सातबारा लागतो. यामुळे डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देण्याची सुधारणा शासनाने केली आहे.
हा तालुका सुजलाम-सुफलाम करण्याचे उद्दिष्ट आणि तालुक्यातील अडीअडचणी सोडवण्याचे मुख्य ध्येय आमदार सचिन पाटील यांचे आहे.
    यावेळी आमदार सचिन पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, हा उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट सर्वसामान्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा, असे आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून हे शासन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोहोचवत आहे.
       मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत. पानंद रस्त्यांचा प्रश्न सोडवला आहे. वेगवेगळ्या अपघाती योजना सुरू ठेवून त्याचा लाभ दिला जात आहे. मतदार यादी अद्यावत करणे, ई-पीक प्रणाली, शेतकऱ्यांना विहिरीसाठी साडेपाच लाख रुपये दिले जात आहेत.
    जे कोणी ज्या योजनेत बसतात, त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जात आहे. अंगणवाडी सेविका चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेत पंधराशे रुपयांपर्यंत न थांबता लाभार्थी लखपती व्हाव्यात, यासाठी काम सुरू आहे. शेतकऱ्यांना एका वर्षात तालुक्यात ४०० ट्रॅक्टर देण्यात आले. मी १६ महिन्यांत तालुक्यातील प्रत्येक गावात स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन योजना पोहोचवल्या. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाची परतफेड म्हणून मी हे काम करत आहे. शासन आपल्या घरात आणून ज्या-ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.
या कार्यक्रमासाठी फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, गटविकास अधिकारी श्री. प्रकाश बोंबले, कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन श्री अमरसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.

हे ही वाचा  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटणसाठी १२३० घरकुलांचे उद्दिष्ट; नागरिकांनी लाभ घ्यावा - मुख्याधिकारी निखिल जाधव व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन

नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण रखडले; पंढरपूर पुलावरील ग्रील गायब – नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटणसाठी १२३० घरकुलांचे उद्दिष्ट; नागरिकांनी लाभ घ्यावा – मुख्याधिकारी निखिल जाधव व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांचे आवाहन

फिरंगाई देवी, महादेव व भैरवनाथ यात्रेसाठी फलटण नगरपालिकेची खर्चास मंजूरी ; ४६ विषयांवर सविस्तर चर्चा बहुतांश सर्व ठराव बहुमताने मंजूर

error: Content is protected !!