सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी

On: November 7, 2025 2:18 PM
Follow Us:

फलटण : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सातारा जिल्ह्यातील ६५ जिल्हा परिषद निवडणूक विभाग व १३० पंचायत समिती निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार, सातारा जिल्ह्यातील सर्व ६५ जिल्हा परिषद गट व १३० पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे.

फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत सजाई गार्डन, जाधववाडी, फलटण येथे सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.या सोडतीदरम्यान सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच इच्छुक नागरिक उपस्थित राहू शकतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या सोडतीनंतर प्रत्येक गट व गणाचे आरक्षण निश्चित होणार आहे.

हे ही वाचा  प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेवक पदासाठी तब्बल 14 नामांकन अर्ज दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

घराबाहेरील विद्युत प्रवाह ठरला जीवघेणा; काही क्षणांत शिंदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू

श्रीराम साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवर ६ जुलै रोजी सभासदांची बैठक

स्मार्ट मीटर प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

फलटण बाजार समितीत कांद्याला तेजी; घडिया ब्रदर्स यांच्या अडतीवर प्रतिक्विंटल ३ हजारांचा उच्चांकी दर

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू

अभयसिंह जगतापांच्या विजयासाठी पडद्यामागे ‘मास्टर प्लॅन’? सांगली-सातारा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा!

error: Content is protected !!