सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मुधोजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

On: April 17, 2026 12:15 PM
Follow Us:

फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भारतरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. फिरोज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राज्यघटनाकार होते. त्यांच्या संविधानात्मक कार्याचा आदर्श अनेक देशांनी घेतला आहे. तसेच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांची प्रतिमा लावण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी वंचित व उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ज्येष्ठ पत्रकार मुकुटराव कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तसेच हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना समान हक्क मिळवून दिले, जे अत्यंत क्रांतिकारी पाऊल होते. त्यांच्या विचारांचा आदर्श आजच्या समाजाने जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत शेट्ये यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  फलटण बाजार समितीत कांद्याला तेजी; घडिया ब्रदर्स यांच्या अडतीवर प्रतिक्विंटल ३ हजारांचा उच्चांकी दर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!