सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

इंजिनिअरिंग युनिव्हर्स ए. इ. व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

On: April 20, 2026 10:13 AM
Follow Us:

फलटण – इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्यात युवाशक्ती फाउंडेशनचे श्रीधर पाटील (फिल्ड ऑफिसर), यश शिंदे व रवी मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली.
मेळाव्यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मुलाखती दिल्या असून, त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांची जागीच कंपन्यांमध्ये कामासाठी निवड करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
तसेच, या उपक्रमातून स्थानिक तरुणांना कौशल्याधारित रोजगार मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या  मेळाव्यासाठी इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे संस्थापक श्री अक्षय अब्दागिरे सर यांच्या सहित विराज क्षीरसागर, आदित्य किसे, किरण पोंदकुले, गणेश अब्दागिरे, प्रशांत शिंदे यांचे सहकार्य लाभले.

हे ही वाचा  मॅग्नेशिया कंपनी विस्तारासाठी MIDC मध्ये महिन्याभरात जागा; रोजगारनिर्मितीला चालना, अतिरिक्त MIDC बाबत मंत्री सामंतांचे स्पष्ट संकेत!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!